Ad will apear here
Next
पुण्यात विशेष मुलांसोबत बालदिन साजरा


पुणे :
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अर्थात बालदिनानिमित्त काँग्रेस पक्षातर्फे पुण्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कामायनी संस्थेतील मूकबधिर व मतिमंद या विशेष मुलांसोबत जंगली महाराज रोडवरील ‘मॅकडोनाल्ड’मध्ये बालदिन साजरा करण्यात आला. 



या वेळी मुलांच्या हातावर टॅटू पेंटिंग करण्यात आले. मुलांचे स्केच काढून देण्यात आले. या विशेष मुलांनी केक कापून पंडितजींच्या नावाच्या घोषणादेखील दिल्या. फ्रेंच फ्राइज, कॅडबरी, केक, आइस्क्रीम आणि बर्गर या खाऊचाही आनंद त्यांनी लुटला. त्यांची आनंदी मुद्रा पाहून सर्वच जण भावुक झाले होते. 



या विशेष मुलांसोबत बालदिन साजरे करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. तसेच गेली २० वर्षे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसोबत बालदिन साजरा करण्यात येतो. पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी कामायनी संस्थेतील कालिदास सुपाते, श्रीलेखा कुलकर्णी, सागर आरोळे, अभिषेक बागुल, इम्तियाझ तांबोळी, संतोष पवार, गोरख मरळ, सुरेश कांबळे, राजाभाऊ पोळ, महेश ढवळे, बाबासाहेब पोळके, सुधीर सोनावणे, अभिजित गायकवाड, भाऊसाहेब दोडके, मनीषा निंबाळकर आदी उपस्थित होते.  

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZVZCG
Similar Posts
बालदिनी विशेष मुलांसाठी काँग्रेसतर्फे खास कार्यक्रम पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिनानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीने कामायनी संस्थेतील मूकबधिर व मतिमंद मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. जंगली महाराज रोडवरील मॅकडोनाल्ड येथे १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. टॅटू पेंटिंगसह अन्य वेगवेगळ्या गमतीजमतींचा
मी ‘पुलं’चा एकलव्य : अशोक सराफ पुणे : ‘‘पुलं’चा प्रत्यक्ष सहवास मला लाभला नसला, तरी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून मी कायमच त्यांच्या सहवासात असतो. साहित्यातून पात्र उभे करण्याची ‘पुलं’ची शैली अवगत करून मी ती माझ्या अभिनयाद्वारे चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी यशस्वी ठरलो आहे. मी ‘पुलं’चा एकलव्य आहे.
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा तीन विरुद्ध दोन गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांनी असंख्य कुस्तीशौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत
नऊ नोव्हेंबरला प्रकाशित होणार ‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ पुणे : केवळ आपल्या हौसेखातर चाळिशीत विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन एकच इंजिन असलेले विमान अमेरिकेतून दिल्लीपर्यंत चालवत आणण्याचा विक्रम सतीशचंद्र सोमण यांनी १९९४मध्ये केला होता. या विक्रमी प्रवासाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर, या प्रवासाची गोष्ट आता पुस्तकरूपाने प्रकाशित होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language